शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२

गुरुवार, १९ जुलै, २०१२

"दादा" ची भिंत !: मिसळ

"दादा" ची भिंत !: मिसळ: वेळ: प्रात:काळची श्री. पेपरात डोके खुपसून बसलेले. सौ. चहाची कपबशी घेऊन  त्यांच्यासमोर येते, सौ. : अहो, ऐकलंत का? आज ऑफिसमधून येताना बाजारात... ह

मिसळ

वेळ: प्रात:काळची श्री. पेपरात डोके खुपसून बसलेले. सौ. चहाची कपबशी घेऊन  त्यांच्यासमोर येते,
सौ. : अहो, ऐकलंत का? आज ऑफिसमधून येताना बाजारातून....
श्री. : ‍(डोके पेपारातच) हूं. थांब ना जरा..."काय?... शेअरबाजारात उसळी? अरे वा!"
सौ. : (चिडून कपबशी समोर आदळत) अस्सं काय? मग आज येताना घेऊन या  शेअरबाजारातील उसळीच. करून खाऊ घालते "शेअरबाजारातल्या उसळीची मिसळ" टेस्टी लागेल.

संता बंताची धमाल

संता एक दिवस मैत्रिणी सोबत बगीच्यात बसला होता. ते एका वयस्कर माणसाने पाहिले आणि तो संताला म्हणाला "बेटा काय चाललय ही काय आपली संस्कृति आहे?" संता ने तत्परतेने उत्तर दिले "नाही हातर आपला पटियाला वाला दिलेर आहे"
.
संता एक दिवस कुंडली घेऊन ज्योतिषा कडे गेला
ज्योतिषी म्हणाला "तुझे नाव संता सिंग आहे"
संता म्हणाला "होय महाराज"
ज्योतिषीने प्रश्न केला "तुला दोन मुले आहेत?"
संता म्हणाला "जी महाराज"
ज्योतिषी पुढे म्हणाला "तू आताच १५ किलो तांदूळ खरेदी केले आहेस?"
संता आश्चर्याने बोलतो " हा महाराज तुम्ही तर अगदी अंतरयामी आहात."
ज्योतिषी रागाने म्हणाला "बेटा संता पुढच्या वेळी येशील तर कुंडली घेऊन ये रेशन कार्ड नाही"
.
एकदा संताला प्रेम झाले तो मनातल्या मनात गुनगुनत राहायचा आणि स्वप्न सजवायचा.
एक दिवस संता बंताला म्हणाला "मित्रा मला प्रेम झाले आहे"
बंता म्हणाला "कोणा सोबत"
संता बोलतो "मित्रा नाव नाही माहीत"
"काय करते"
"मित्रा समोरील बँकेत कैशियर आहे"
बंता म्हणतो "अरे मला तर तीचे नाव माहीत आहे"
संता "काय आहे लवकर सांग"
बंता लगेच बोलतो "ज्या टेबल वर ती बसते तेथे नेम-प्लेट लिहिली आहे.......चालू खाता"
.
एकदा संताला घोड्याने लाट मारली. संताला राग आला आणि त्याने घोडयाला पळवले. घोडा पळता पळता जंगलात आला आणि हरवला.
संता पळत राहिला रस्त्यात संताला झेब्रा दिसला.
संताने त्याला मारायला सुरुवात केली आणि ओरडून ओरडून बोलू लागला ट्रेक सुट घालून मला फसवत आहेस.

बुधवार, १८ जुलै, २०१२

हिरवं कोकण...


एन्रॉनमुळे गेली अनेक वर्षं गाजावाजा झालेला गुहागरजवळचा दाभोळ खाडीचा टापू. खाडीच्या विस्तीर्ण पसारा बघत वळणावळणाच्या रस्त्यानं डोंगर चढून गेलं की धोपावेचा माळ येतो. पर्यावरण दिनाच्या निमित्त कोकणाची यात्रा करतकरत आम्ही आणखी एका माळावर येऊन पोहोचलो होतो. खाडीच्या वरच्या बाजूच्या डोंगरावर हिरवाईनं वेढलेल्या एका माळावर. उन्हं चढत जातात तसं या माळाला एखाद्या युद्धभूमीचं रूप येऊ लागतं. ट्रक, टेम्पो, गाड्या, मोटरसायकली...मिळेल ते वाहन पकडून आलेले आजुबाजूच्या गावांतले, खाडीच्या अलीकडचे, पलीकडचे, डोंगरउतारावरच्या वस्तीतले लोक एकत्र जमा व्हायला लागतात.

वेगवेगळ्या भागांतून आलेल्या या गावकर्‍यांचा निर्धार एकच आहे. धोपावेच्या माळावर सर्व्हे करण्यासाठी आलेल्या सरकारी लोकांना परतवून लावण्याचा. एरव्ही बड्या बड्या कंपन्यांशी सुरू असलेली लढाई इथे मात्र सरकारशी आहे. कारण धोपावेच्या माळावर महाजनकोचा औष्णिक वीजप्रकल्प येतोय. आणि या प्रकल्पाला धोपावेच्याच नव्हे तर दाभोळ, दापोली, जयगड या सगळ्या पट्‌ट्यातल्या गावकर्‍यांचा तीव्र विरोध आहे.
याच परिसरानं काही वर्षांपूर्वी एन्रॉन विरुद्धच्या आंदोलनाची धग अनुभवली होती. धोपावेला जाताना एन्रॉन  म्हणजेच आताच्या रत्नागिरी गॅस पॉवर लिमिटेड प्रकल्पाच्या भल्यामोठ्या चिमण्या दिसत राहतात. या प्रकल्पापासून काही किलोमीटरच्या अंतरातच धोपावेचा औष्णिक प्रकल्प येऊ घातलाय. त्यातच भोपणला GMR कंपनीनं आणखी एका प्रकल्पाची घोषणा केलीय. हा प्रकल्प कोळशावर चालेल की गॅसवर हे अजून अधांतरीच आहे. पुढे दापोलीजवळ अंजर्ल्याला आणि केळशीला टियाना ग्रुपच्या ओष्णिक प्रकल्पांची घोषणा झालीय. मच्छिमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णे बंदराजवळही आणखी एक औष्णिक प्रकल्प येतोय.

ज्या परिसरात याआधी एका वीजप्रकल्पानं एवढं रणकंदन माजवलं त्याच परिसरात एवढे सहासहा प्रकल्प का आणायचेत तुम्हाला ? कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प इथे आणून तुम्हाला नेमका कुठला विकास साधायचाय ? अशा विनाशकारी प्रकल्पांनी आमच्या हिरव्यागार कोकणाचं काय होईल..? आमच्या पुढच्या पिढ्या कशावर जगतील ? याचा विचार केला आहात का तुम्ही ? एकामागून एक प्रश्नांनी माळ घुमत होता.. कोकणच्या माणसांचा या लढ्याचे ढोल अख्खा खाडीच्या टापूत वाजत होते. इथले वारे आता बदललेत. एकेकाळी समृद्ध कोकणाचा कॅलिफोनिर्या करण्याच्या घोषणा इथे दिल्या जायच्या, पर्यटन, फळबागायतीच्या मोठमोठ्या योजना आखल्या जायच्या तिथे आता या किनारपट्ट्ीला औष्णिक प्रकल्प आणि मायनिंगचा वेढा पडलाय. कोकणची समृद्धी वाढवण्यासाठी झटणार्‍या माणसांना आता आहे ती निसर्गसंपत्ती वाचवण्यासाठी लढा द्यावा लागतोय.

गुहागरजवळच्या धोपावेच्या या माळावर हाच लढा सुरू आहे, त्याच घोषणा आहेत आणि तेच प्रश्न. हा माळ आत्ता दिसतो तसाच होता रत्नागिरीजवळच्या जयगडचा माळ.. बंदरावरून समुद्रात जाणारी जहाजं, मच्छिमारी करणार्‍या होड्या, सोसाट्याच्या वार्‍यावर डुलणारी माडांची बनं, डोंगरउतारावरच्या हिरव्याकंच आमराया आणि जांभ्या खडकावर थडकणार्‍या अजस्त्र लाटा .. जयगडचं हे वर्षानुवर्षं बघितलेलं दृश्यं मनात ठेवून इथे गेलं तर धक्का बसतो. जिंदालच्या औष्णिक वीजप्रकल्पाच्या चिमण्या धूर ओकत असतात. बंदरावरून प्रकल्पात उतरवला जाणारा हजारो टन कोळसा...आणि कोळसा जाळल्यानं तयार झालेल्या फ्लाय ऍशचे म्हणजे राखेचे ढिगारे... वीजनिमिर्तीसाठी समुद्रातून उपसलेलं लाखो लिटर पाणी... आणि टर्बाइन्स थंड करणार्‍या गरम पाण्याचा तिथेच सोडून दिलेला खळाळता प्रवाह.. समुद्राचं हे खारं पाणी इथल्या विहिरींमध्येही झिरपलंय. जयगड आणि नांदिवडे गावातली एकही विहीर पाणी पिण्याजोगी राहिलेली नाही.

आमच्या गावात कधी दिवसांतून एकदा येणार्‍या नळाच्या पाण्यावर राहावं लागेलं, असं वाटलंही नव्हतं. हे असलं विहिरीचं पाणी पिऊन इथे बळी गेलेत. अनेक जण आजारी पडलेत.. नांदिवड्याच्या वस्तीतल्या महिला ओरडून ओरडून सांगत होत्या. आंब्याच्या बागेत कलमांवरचे शेवटचे आंबे उतरवण्याचं काम चाललं होतं. पण पुढच्या वर्षी आंबे धरतीलच याची शाश्‍वती बागायतदारांना नव्हती. रिलायन्सच्या औष्णिक प्रकल्पामुळे डहाणूच्या चिकूच्या बागांचं जे झालं तेच आमच्या आंब्याचं होईल..झाडांवर फ्लायऍश पडल्यामुळे मोहोर गळून पडेल..याची चिंता प्रत्येक जण सारखी बोलून दाखवत होता.

गावावर हे आक्रित येणार आहे..हे जयगडच्या लोकांना माहीत होतं. आणि म्हणूनच त्यांचा या प्रकल्पाला विरोध होता. पण प्रकल्पाचं राजकारण झालं, वेगवेगळे गट पडले आणि अखेर गावाची फसगत करून जिंदालचा औष्णिक वीजप्रकल्प उभा राहिला. आता इथे उरलंय..ते औष्णिक प्रकल्पाच्या राखेचं, खार्‍या पाण्याचं प्रदूषण आणि आवाज हरवून बसलेले गावकरी..यातून धडा घेऊन पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी कोर्टात लढा दिला तेव्हा कुठे पर्यावरण परवान्याच्या मुद्द्यावर या प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याला स्थगिती मिळाली.

दाभोळ, दापोलीच्या लोकांना ही वेळ आपल्यावर येऊ द्यायची नाहीये. आणि म्हणूनच कागदपत्रांनिशी, नियमांच्या चौकटीत, पर्यावरणाचा शास्त्रीय अभ्यास करून लोक लढतायत. एकत्र येतायत. बेकायदेशीर, प्रदूषणकारी वीजप्रकल्पांविरुद्ध आवाज उठवतायत. तुमच्याकडे प्रकल्पासाठी पर्यावरणाचा परवाना आहे का ? तो नसताना प्रकल्पासाठी जमिनीचा सर्व्हे करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे टोकदार सवाल सरकारी यंत्रणांना ठणकावून विचारतायत.

 कोकणी माणूस प्रत्येक प्रकल्पाला, विकासाला विरोध करतो, असा उद्योजकांचा आणि सरकारचा अजब दावा. पण इथली मूळ निसर्गसंपत्तीच नष्ट करून काय विकास होणारेय याचं उत्तर इथल्या लोकांना कुणीच देऊ शकलेलं नाही. हा असा विनाशकारी 'विकास' रोखण्यासाठी जिथे जिथे गावकरी एकत्र आले तिथे सरकारला त्यांच्यापुढे झुकावंही लागलंय.

सिंधुदुर्गातल्या विजयदुर्गमधलं गिरये हे गाव औष्णिक प्रकल्पांविरुद्धच्या लढ्यामध्ये बाजी मारून गेलं. समद्राकाठीचं मोठं पठार असलेलं आंबाबागायतीचं हे गाव. आपल्या गावात कोळशावरचा वीजप्रकल्प येणार आहे..त्यासाठीचा प्रस्ताव आलाय..याची कुणकुण गावकर्‍यांना लागली तेव्हापासूनच नियमानं, कायदेशीर बाबी चोख ठेवून या गावानं लढा दिला. हा प्रकल्प आला तर आपली बागायत कायमची जाईल..हे गिरयेनं ताडलं. ग्रामसभांचे ठराव झाले..प्रकल्पाला एक इंचभरही जमीन न देण्याचा निर्धार गावकर्‍यांनी केला आणि अखेर सरकारला गिरयेतून माघार घ्यावी लागली.पण हाच प्रकल्प आणखी दुसर्‍या समुद्रकिनार्‍यावर हलवला जाणार नाही ना..याची धाकधुक आंदोलकांना आहेच.
  

पाणीवाली बाई' काळाच्या पडद्याआड


ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचं आज निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. मागिल काही दिवसांपासून मृणालताई आजारी होत्या. आज दुपारी वसई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार घेत असताना मृणालताई यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. वसईतल्या लोकसेवा मंडळ सभागृहात त्यांचं पार्थिव संध्याकाळी साडेसात ते साडेनऊपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मृणाल गोरेंवर उद्या दुपारी 12 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
 

सर्वसामान्यांचा आवाज.. हीच मृणालताईंची ओळख. 1928 साली मोहिलेंच्या घरात त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात वैद्यकीय शिक्षण घेतानाच त्यांनी समाजकार्यात उडी घेतली. डॉक्टरांपेक्षाही समाजाला समाजसेवकांची गरज आहे, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी डॉक्टरकी सोडली. त्या गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाल्या होत्या. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी राष्ट्र सेवा दलात प्रवेश केला. वर्षभरातच त्यांनी इतर काही तरुणांसोबत सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. 

चळवळीतच त्यांची ओळख केशव गोरेंशी झाली. लग्नानंतर दोघांनी मिळून मुंबईत नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं केली. त्यांना नागरी सुविधा मिळाव्यात, गरिबांच्या झोपड्या वाचाव्यात, म्हणून त्यांनी सत्याग्रह केले. पुढे मृणालताई आणि केशव गोरेंनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.

1961 साली त्या मुंबई महापालिकेवर निवडून गेल्या. लोकांना प्यायला पाणी मिळावं, म्हणून त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्यासाठी त्यांना पाणीवाली बाई अशी ओळख मिळाली. महापालिकेचं कामकाज मराठीतच व्हावं, यासाठी त्यांनी आग्रह धरला. 1972 साली विधानभेवर निवडून गेल्यावर मृणालताईंनी दलितांच्या, महिलांच्या, आदिवासींच्या समस्या धडाडीने मांडल्या. 

1977 साली त्या जेव्हा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकभेत निवडून गेल्या, तेव्हा..'पानीवाली बाई दिल्ली में आणि दिल्लीवाली बाई पानी में..' अशी घोषणा झळकली. 1985 साली त्या पुन्हा आमदार झाल्या, स्त्रीभ्रूणहत्येविषयीचा कायदा पास करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. 

गोरगरीबांना हक्काची घरं मिळावीत, म्हणून त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्यांच्यामुळे नागरी निवारा परिषदेअंतर्गत 6 हजार घरं बांधण्यात आली. म्हणूनच त्यांना सर्वसामान्यांचा आवाज म्हटलं गेलं.

शरद पवारांशिवाय क्रिकेट...!


गुगलवर नुसतं शरद पवार टाईप करा तुम्हाला फक्त 8,76,000 हजार पाने मिळतील. पण हेच जर तुम्ही 'शरद पवार क्रिकेट' असे तीन शब्द एकत्रित टाकलेत तर मिळतात एकूण 13,60,000 पाने... म्हणजेच तब्बल पाच लाख पाने जास्त... शरद पवाराचं क्रिकेटशी काय नातं आहे हे सांगणारं हे एक उदाहरण... आणि हेच शरद पवार आता क्रिकेटमधील आपलं अवतार कार्य येत्या रविवारी संपुष्टात आणतायत.. शरद पवारांशिवाय क्रिकेट ! ...मीडियासाठी ही गोष्ट म्हणजे तशी वाईटचं... मैदानाबाहेरील क्रिकेटला रंगतदार बनवण्यात पवारांचा हात कुणीही धरू शकणार नाही. गेली 12 वर्ष क्रिकेट प्रशासक म्हणून त्यांची कारकिर्द वादळी राहीली. अनेक वादळं त्यांनी अंगावर घेतली आणि आपल्या अंगीभूत सामर्थ्यांनं त्यांचा मुकाबलाही केला. भारतीय क्रिकेटसाठी पवारांची ही कारकिर्द निर्णायकी ठरली. खर तर त्याच्यावर एक अख्ख पुस्तक निघू शकेल, पण आज ही फक्त प्रस्तावनाच...

  

मी त्यावेळी दै. सामनात क्रीडा विभाग प्रमुख म्हणून काम पहात होतो. मनोहर जोशी मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. मुंबई क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री विराजमान होण्याची ती पहिली वेळ होती. जोशींचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आलेला. जोशीनंतर कोण यावर त्यावेळी सॉलिड सस्पेन्स होता. आणि अचानक एकेदिवशी पवारांच्या अगदी जवळच्या व्यक्तीकडून निरोप आला. 'पवार साहेब इंटरव्ह्यूव्ह देतायत. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी".. मी दै. सामनाचा प्रतिनिधी, त्यात शिवसेनेचा अजित वाडेकर यांना पाठिंबा माझ्यासमोर पेचप्रसंग... संजय राऊत हे माझे संपादक, मी राऊत सरांकडे विचारणा केली आणि त्यांनी मला क्षणाचाही विलंब न लावता परवानगी दिली. दुसर्‍या दिवशी पवारांचा दै.सामनात हाफ पेज इंटरव्ह्युव्ह... अनेकांच्या त्यावेळी उंचावलेल्या भुवया मला आजही आठवतायत. माझा पवारांना पहिलाच प्रश्न होता मी दै. सामनातून आलोय. अनेक अडचणींचे प्रश्न सोबत घेऊन..त्यावर ते दिलखुलास हसले होते. माझ्या प्रत्येक प्रश्नाला त्यांच्याकडे अचूक उत्तर होते. 'नो कॉमेंट' हे शब्द जणू त्यांच्या शब्दकोषातचं नसावेत. अशाप्रकारे पवारांच्या क्रिकेटशी माझा संबध आला तो त्यादिवसापासून..


19 जानेवारीला मुंबई क्रिकेट संघटनेचं इलेक्शन होतं. त्याआधी 17 जानेवारीला वाडेकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यात वाडेकरांचा ड्रायव्हर जखमी झाला होता. दै. सामनात ही बातमी पहिल्या पानावर छापल्यावर दुसर्‍यादिवशी राष्ट्रीय वर्तमानपत्रांनीही त्याची दखल घेतली होती. 19 जानेवारीचा दिवस उजाडला. एमसीएचं वातावरण खुपचं तणावपुर्ण होतं. मी दै.सामनाचा असल्यानं सहाजिकचं पवारांच्या कॅम्पच्या रोषाचा बळी होतो. एमसीएतील माझ्या जुन्ह्या सहकार्‍यांनी तर मला रिपोटीर्ंगला येऊ नको असेही बजावले होते. न जाणो पवार हरलेच तर समर्थक तुला टार्गेट करतील अशी काळजीयुक्त माहितीही त्यांनी मला दिली होती. तरीही मी आवर्जुन गेलो. मला त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार व्हायचं होतं. पवार जिंकले तर बातमी होतीच, पण हरले त्यापेक्षा मोठी बातमी होती.. पण पवार जिंकले... एकुण 185 मतं पवारांना पडली. तर 125 मतं वाडेकर यांच्या खात्यात जमा झाली. पवारांच्या विजयानं मग वातावरणातील सगळं टेन्शन दुरं झालं. गेली 10 वर्ष त्यांनी अनभिषिक्तपणे मुंबई क्रिकेटवर राज केलं. अनेक वाद मिटवले, नवे जन्माला घातले.

पवारांच सगळ्यात लक्षात राहण्यासारखं काम म्हणजे त्यांनी स्थापन केलेली 'सीआयसी' म्हणजे क्रिकेट इम्प्रुव्हमेंट कमिटी.. संघटनेतील पदाधिकार्‍यांच्या हाती वर्षानुवर्ष असलेल्या क्रिकेट विकासाची मक्तेदारी पवारांनी मोडीत काढून ती क्रिकेटर्सच्या हाती सोपवली. त्यात अगदी क्रिकेटच्या टीम निवडीपासून ते मैदानाच्या तयारीपर्यंत सगळे निर्णय हे क्रिकेटचा भरणा असलेल्या क्रिकेट इम्प्रुव्हमेंट कमिटीकडे सोपवले. दुसरे म्हणजे पवार हे गरवारे क्लबचे अध्यक्ष होते. गरवारे क्लब आणि वानखेडेतून विस्तव जात नव्हता. दोघांकडून कोर्टकचेरीपायी करोडो रुपये खर्च झाले होते. पवारांनी आपल्या कारकिर्दीत दोघांत समेट घडवून आणला. बीसीसीआयचं मुख्य कार्यालय मुंबईत दिमाखात उभं केलं. वानखेडे स्टेडियम वर्ल्डक्लास बनवलं. मुंबई क्रिकेट हा काही पवारांचा अंतिम टप्पा नव्हता.. जेथे जाऊ तेथे नंबर एक बनलं पाहिजे हा त्यांचा ध्यास. त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचं स्वप्न पडलं. पण तेथे जगमोहन दालमिया त्यांच्या आड आले.

सार्वजनिक जीवनात पवार फक्त एकचं निवडणूक हरले आणि तेही क्रिकेटच्या मैदानावर.. दालमियांचे समर्थक रणविर सिंग यांनी अवघ्या एका मतानं पवारांना पराभूत केलं. दगा हा गाफिल असतानाचा होतो तसा पवारांच्या बाबतीत घडलं. ज्या महाराष्ट्रानं त्यांना घडवलं. राजकीय चेहरा दिला त्याच महाराष्ट्रातील, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतील संधोपसुंधीनं पवारांचा घात केला. ज्ञानेश्वर आगाशे आणि अजय शिर्के यां दोघांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर दावा ठोकल्यानं महाराष्ट्राचे मतचं बाद करण्यात आलं. दालमियांनी यात मोठं राजकारण केलं. त्यामुळे पवार आणि रणविर सिंग यांना समसमान 15-15 मतं पडली. अशावेळी दालमिया यांनी आपल्या अध्यक्षपदाचं मत रणविर सिंग यांच्या पारड्यात ठाकून पवारांचा रोष ओढावून घेतला. हार मानतील ते पवार कसले. पुढच्याच टर्मला फुल प्रुफ प्लॅनिंग करून पवार बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. आणि दालमियांवर 1996 च्या भ्रष्टाचाराचे आरोप 2005 मध्ये ठेवून त्यांना क्रिकेटमधून बडतर्फ केले. हे फक्त पवारचं करू शकतात.

दालमियांनी क्रिकेटमध्ये अब्जोवधी रुपये आणले. ते बीसीसीआयच्या तिजोरीत जमा झाले. पण तिजोरीत बंदिस्त असेलेले हे पैसे खेळाडूंच्या खिशापर्यंत नेण्याचं काम शरद पवारांनी केलं. खेळाडूंना निवृत्ती वेतन देण्याची त्यांची योजना सुपरडूपर हिट ठरली. त्यांच्याच काळात आयपीएल जन्माला आलं. केवळ स्टार क्रिकेटर्सच नव्हे तर लोकल क्रिकेटरही श्रीमंत झाले. पण क्रिकेटमधिल हा खळाखळाणारा पैसा क्रिकेटचं वैभव नष्ट करतोय अशी टीकाही त्यांच्यावर झाली. पवारांच्या कारकिर्दीतचं वर्ल्डकप क्रिकेटचं यशस्वी आयोजन झालं. आणि विशेष म्हणजे भारतानं हा वर्ल्डकप जिंकालाही. भारतानं पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता त्यावेळीही बीसीसीआयचे अध्यक्ष एक मराठीचं माणूस होता. एनकेपी साळवे तेव्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होते, आणि 2011 साली भारत वर्ल्डकप जिंकला तेव्हा शरद पवार आयसीसीचे अध्यक्ष होते. 1983 च्या वेळी वर्ल्डकप विजेत्यांसाठी पैसे जमा करण्याकरीता साळवे यांना लतादिदींना गाण्यासाठी साकडे घालावे लागले होते.पवारांच्याच कारकिर्दीत टी 20 चा वर्ल्डकप भारतानं जिंकला.

भारतीय क्रिकेटमधिल मॅचफिक्सिंगचा भूकंप पवार क्रिकेटमध्ये येण्यापुर्वी झाला होता, पण त्याचे पडसाद त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतही उमटलेचं, पण पवार या सर्वाला पुरून उरले. प्रत्येक समस्येवर उपाय असतो, फक्त तो शोधायचं असतो, इतरांच्या तुलनेत पवार हा उपाय अधिक वेगानं शोधायचे इतकेचं... अर्थात हे सगळं इतकं सरळ सोपं साधं आणि आदर्श होतं असं नाही बरं का.. पवारांच्या या 12 वर्षात अनेक घटना अशा घडल्या ज्याबद्दल क्रिकेट वर्तुळात अजुनही दबक्या आवाजात चवीनं बोललं जातं. शरद पवारांविरोधात वाडेकरांनंतर दुसर्‍या टर्मला एमआयजीचे प्रवीण बर्वे उभे राहणार होते.पण रातोरात बर्व्हेंच्या घरावर इन्कमटॅक्सची धाड पडते काय आणि त्यांना नाना चौकश्यांना सामोर जावे लागते काय... बीसीसीआयची निवडणूक ज्या ज्ञानेश्वर आगाशेंमुळे पवारांना गमावावी लागली ते आगाशे त्यांच्या उर्वरीत आयुष्यात देशोधडीला लागले... बँक घोटाळ्याप्रकरणी तर त्यांना जेलही झाली. यामागे काही कार्यकारण भाव आहे की पवार फोबीया ? याची उत्तरे येणार काळ देईलचं.

पण एक मात्र नक्की या घटनांवरुन युध्दात, प्रेमात आणि क्रिकटमध्ये सबकुछ माफ असते अशी नवी म्हण जन्माला आली एवढं खरे... असो, पवार यांनी क्रिकेटमध्ये पॉवरफुल राज्य केले. आधी म्हटल्याप्रमाणे मैदानावरील क्रिकेट एवढेचं मैदानाबाहेरील क्रिकेटही त्यांनी रोचक आणि रोमहर्षक केलंय.



संदीप चव्हाण
एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं
ठरवतात, मुलगा पहिले उडी मारतो,
पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.....ते बघून
पोरगा पाठीवरचं पॅरेशूट उघडतो आणि म्हणतो,
साली चेटकीण मला माहित होत
ही उडी नाही मारणार ..............
.
.
त्या दिवसापासून लोकं म्हणू लागले......LADIES
FIRST.....




surajdhanajigiri.in







पावसात…


ढगांच गरजण,
अन पावसाच बरसन…
तुझी वाट पाहताना,
माझ्या डोळ्याचं तरसन…
पावसात ,
तू सोबत असण म्हणजे प्रत्येक क्षणात जगण…
तू नसण…जस थेंबा-थेंबात मरण…
पावसात…
तुला पाहताना,
अश्रू गालावरच्या थेंबात जेव्हा मिसळतात ….
जणू ते त्याचं असणंच विसरतात….
पावसात…
तुझ्यासोबत,
शरीर चिंब चिंब भिजलेल…
मनात त्यावेळी प्रितीच एक नवं बीज रुजलेल….
असा हा पाऊस येतो…आणि जातो…
जाताना मात्र प्रत्येकवेळी, नव्याच आठवणी देऊन जातो….
तुझ्याच आठवणी भरल्यात अशा प्रत्येक पावसात…
पावसापेक्षा आठवणीच जास्त येतात आता पावसाच्या दिवसात….
- अमर ढेंबरे

पुन्हा तोच पाऊस….


पुन्हा तोच पाऊस….
अन पुन्हा तोच वारा…..
पुन्हा भावनांचा,
तोच खेळ सारा….
पुन्हा तोच सागर…
नव्याने उधाणलेला….
एक मात्र मनात…..
तसाच तहानलेला….
त्याच विजा नव्याने….
पुन्हा कडाडलेल्या….
तोफा भावनांच्या हृदयी…..
तशाच धडाडलेल्या…..
पसरला श्रावणाने….
फिरुनी तोच सडा….
परत पाणावलेल्या माझ्या,
नयनांच्या त्याच कडा…..
- अमर ढेंबरे

नजरेचा खेळ !!!

नजरेचा खेळ  !!!




खेळ नजरेचा मला
कधी जमलातच नाही..

म्हणूनच कदाचित
माझं प्रेम मला भेलंच नाही..

नाती


तू खेचू नकोस उगा 
गाठ सुटणार नाही
दोर तुटल्यावरी 
वीण बसणार नाही .
तू हिसकावू नकोस 
काही मिळणार नाही 
सारे सांडेल भूवरी 
तुज कळणार नाही .
बघ सांगतो तुला न 
भीक मागुस काही 
तू केलिया श्रमाची 
का हवी भरपाई 
देण्याघेण्यात पण
प्रीत असणार नाही 
ओढाओढित अन 
नाती टिकणार नाही 

                   विक्रांत